महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राहुल, सोनिया गांधींसह ८ जणांवर चिथावणीखोर भाषण प्रकरणी गुन्हा दाखल करा

या प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मनीष सिसोदिया, वारिस पठान, अकबरुद्दीन ओवैसी, अमानुल्लाह खान आणि महमूद प्राचा या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

Delhi High Court
सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी

By

Published : Feb 28, 2020, 12:50 PM IST

नवी दिल्ली -चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधीसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी एका याचिकर्त्याने दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे. आता न्यालायाने याप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. १३ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचा अवधी केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

या प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मनीष सिसोदिया, वारिस पठान, अकबरुद्दीन ओवैसी, अमानुल्लाह खान आणि महमूद प्राचा या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

भाजप नेत्यांनी द्वेष पसरवणारे भाषण दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याबाबतही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल आहे. यावर उत्तर देण्यास न्यायालयाने सरकारला अवधी दिला आहे. दिल्ली हिंसाचाराचा तपास विषेश तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या जाळपोळ, हिंसाचाराचा तपास पथकाकडून करण्यात येत आहे. आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणी ५०० नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर ४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details