नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने तुरुंग प्रशासन आणि निर्भया प्रकरणातील दोषींना नोटीस पाठवून फटकारले आहे. गृह मंत्रालयाच्या याचिकेवर न्यायालयाने ही नोटीस पाठविली आहे. दोषींनी कायदेशीर प्रकियांचा विनोद करून ठेवलायं, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणी आज (रविवार) पुन्हा सुनावणी होणार आहे.
'दोषींनी कायदेशीर प्रकियांचा विनोद करून ठेवलाय' - निर्भया प्रकरणाचा निकाल
दिल्ली उच्च न्यायालयाने तुरुंग प्रशासन आणि निर्भया प्रकरणातील दोषींना नोटीस पाठविली असून फटकारले आहे.
निर्भया सामूहिक बलात्कारातील चार दोषींच्या फाशी टळल्यानंतर शनिवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. निर्भया प्रकरणातील दोषींनी कायदेशीर प्रकियांचा विनोद करून ठेवला आहे. फाशी लांबणीवर टाकण्यासाठी सर्व दोषी मिळून काम करत आहेत, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले.
निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. सुरुवातीला दोषी मुकेश शर्माने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर ती याचिकाही फेटाळण्यात आली होती. तर, दुसरा दोषी अक्षयनेही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले होते. अक्षयचे पिटिशन फेटाळल्यानंतर आरोपी असलेला विनय शर्मानेही बुधवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला केला होता. त्यावर शनिवारी राष्ट्रपतींनी विनय शर्माची दया याचिका फेटाळली. आज पुन्हा विनयनंतर अक्षय ठाकुरने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे.