नवी दिल्ली -दिल्ली उच्च न्यायालयाने कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के शिवकुमार यांच्या जामीन याचिकेवरून सक्तवसुली संचालनालयाला नोटीस पाठवली आहे. सध्या शिवकुमार मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या ताब्यात आहेत.
डी. के शिवकुमार मनी लाँड्रिंग प्रकरण : दिल्ली उच्च न्यायालयाची ईडीला नोटीस - डी. के शिवकुमार मनी लाँड्रिंग प्रकरण
दिल्ली उच्च न्यायालयाने कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के शिवकुमार यांच्या जामीन याचिकेवरुन ईडीला नोटीस पाठवली आहे.
शिवकुमार यांची जामीन मिळण्यासाठी दाखल केलीली याचिका कनिष्ठ न्यायालयाने फेटाळली होती. त्यावर शिवकुमार यांनी त्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आज न्यायाधीश सुरेश कुमार यांनी ईडीला उत्तर मागितले आहे. यावर पुढील सुनावणी १४ ऑक्टोबरला होणार आहे.
डी. के. शिवकुमार यांना दिल्ली न्यायालयाने त्यांना ईडीच्या ताब्यात पाठवले आहे. १७ सप्टेंबरपर्यंत ते ईडीच्या ताब्यात असणार आहेत. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने डी. के शिवकुमार यांना ईडीने ३ सप्टेंबरला अटक केली होती. गेल्या वर्षी ईडीने त्यांच्या विरूद्ध आर्थिक गैरव्यवहार केल्याबाबत प्रकरण दाखल केले होते. कर चोरी, हवाला याप्रकरणी शिवकुमार यांच्याविरूद्ध प्रकरणे दाखल करण्यात आली होती.