नवी दिल्ली -दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी तन्वीर मलिकचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आम आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहीर हुसेन यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कालित यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
दिल्ली दंगलीतील आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
ईशान्य दिल्लीत यावर्षी २३ ते २९ फब्रुवारी दरम्यान जातीय दंगल पेटली होती. सहा दिवस चाललेल्या या दंगलीत ५० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपीला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे.
ईशान्य दिल्लीत यावर्षी २३ ते २९ फब्रुवारी दरम्यान जातीय दंगल पेटली होती. सहा दिवस चाललेल्या या दंगलीत ५० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर २०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात दिल्लीत दंगल होण्याआधी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होते. मात्र, या आंदोलनादरम्यान दंगल भडकली होती. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खटला सुरू आहे.
अजय नामक व्यक्तीवर दंगलीदरम्यान जमावाने हल्ला केला होता. यात तन्वीर मलिकचाही समावेश होता. एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेबाबत न्यायालयात जबाब नोंदविला होता. त्याआधारे आरोपींना अटक करण्यात आली होती. मलिक इतरही दोन गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपासात समोर आले होते. त्याच्यावर दयालपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात जामीन न देण्याचे मत न्यायालयाने नोंदविले. विशेष सरकारी वकील अमित प्रसाद यांनी जामीन देण्यास जोरदार विरोध केला होता.