नवी दिल्ली -उत्तराखंड येथील एका तरुणाचा दुबई येथे मृत्यू झाला. त्याचा मृतदेह २३ एप्रिलला भारतात आणला. मात्र, गृहमंत्रालयाचे एक पत्र दाखवून मृतदेह परत पाठवण्यात आला. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवत विदेश मंत्रालयाची परवानगी असताना मृतदेह परत दुबईला का पाठवण्यात आला? याबाबत विचारणा केली. त्यानंतर आज रात्री १ वाजता त्याचा मृतदेह दुबईवरून आणला जाणार आहे.
न्यायालयाच्या नोटीसनंतर रात्री १ वाजता आणणार 'त्या' तरुणाचा मृतदेह - dead body sent back to abu dhabi
उत्तराखंड येथील टिहरीमधील रहिवासी कमलेश भट्ट हा तरुण दुबईमध्ये एका कंपनीमध्ये काम करत होता. त्यांचा १७ एप्रिलला मृत्यू झाला. कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह भारतात आणण्यासाठी विदेश मंत्रालयाकडून परवानगी मागितली. त्यानुसार २३ एप्रिलला दिल्ली विमानतळावर मृतदेह देखील आणले. त्याच्यासोबत आणखी दोन व्यक्तींचे मृतदेह होते. मात्र, गृहमंत्रालयाचे पत्र दाखवून मृतदेह परत दुबईला पाठवण्यात आले.
उत्तराखंड येथील टिहरीमधील रहिवासी कमलेश भट्ट हा तरुण दुबईमध्ये एका कंपनीमध्ये काम करत होता. त्यांचा १७ एप्रिलला मृत्यू झाला. कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह भारतात आणण्यासाठी विदेश मंत्रालयाकडून परवानगी मागितली. त्यानुसार २३ एप्रिलला दिल्ली विमानतळावर मृतदेह देखील आणले. त्याच्यासोबत आणखी दोन व्यक्तींचे मृतदेह होते. मात्र, गृहमंत्रालयाचे पत्र दाखवून मृतदेह परत दुबईला पाठवण्यात आले. त्यानंतर मृत कमलेश भट्ट यांचा नातेवाईक विमलेश भट्ट यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. यावेळी कमलेशचा मृतदेह भारतात आणण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश देण्याची विनंती करण्यात आल्याचे विमलेश यांच्या वकिलांनी सांगितले.
केंद्र सरकारने संबंधित दूतावासाकडून संपूर्ण माहिती घेतली असून कमलेशचा मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिन्दर आचार्य यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने मृतदेह परत का पाठवला? याबाबत केंद्र सरकारला विचारणा केली आहे.