नवी दिल्ली - निजामुद्दीन मरकज येथे तबलिगी जमात कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या नागरिकांना घरी जाण्याची परवानगी दिल्ली सरकारने दिली आहे. ४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना दिल्ली सरकारने ताब्यात घेतले होते. यातील एक हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले होते.
तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेले घरी जाऊ शकतात - दिल्ली सरकार - tablighi jamaat
कोरोनाबाधित तबलिगींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. तर इतरांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
संग्रहित छायाचित्र
कोरोनाबाधित तबलिगींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. तर इतरांना क्वारंटाईन करण्यात आले होते. अनेकजण आता उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांच्यासह इतर क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावरील खटले सुरू राहतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.