महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली सरकारकडून 'कोरोना' 'महामारी' जाहीर; सर्व शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद - कोव्हीड१९

कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने सरकराने सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आधी फक्त ५ वी पर्यंच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती. आता सर्वच शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

By

Published : Mar 13, 2020, 7:40 AM IST

Updated : Mar 13, 2020, 8:21 AM IST

नवी दिल्ली - जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला 'जागतिक महामारी' घोषित केल्यानंतर केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये कोरोनाला महामारी घोषित केले आहे. सरकारने ३१ मार्चपर्यंत चित्रपटगृहे आणि सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपराज्यपाल अनिल बैजल यांनी बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, राज्याचे मुख्य सचिव विजय देव उपस्थित होते. कोरोना आजाराला महामारी घोषित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

३१ मार्चपर्यंत चित्रपटगृहे, शाळा-महाविद्यालये राहणार बंद

कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने सरकराने सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आधी फक्त ५ वी पर्यंच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती. आता सर्वच शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने २५ रुग्णालयेच सज्ज ठेवली आहेत.

Last Updated : Mar 13, 2020, 8:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details