महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली अग्नीशामक दलाकडून गेल्या सहा महिन्यात हजारो पक्ष्यांची सुटका - दिल्ली अग्नीशामक दल लेटस्ट न्यूज

अग्नीशामक दल म्हटले की, लागलेली आग विझवणारे जवानांचे दृश्य नजरेसमोर येते. मात्र, हेच जवान प्राणी आणि पक्ष्यांचीही सुटका करतात. दिल्लीमध्ये अग्नीशामक दलाने मार्च ते सप्टेंबर या काळात हजारो पक्ष्यांची सुटका केली आहे.

birds
पक्ष्यांची सुटका

By

Published : Oct 4, 2020, 3:44 PM IST

नवी दिल्ली - मार्च ते सप्टेंबर महिन्यादरम्यान राजधानी दिल्लीमध्ये अग्निशामक दलाने २ हजार ४००पेक्षा जास्त पक्ष्यांची सुटका केली आहे. साधारण ऑगस्ट महिन्यात अशा घटनांची संख्या जास्त असते. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील नागरिक पतंग उडवतात. या पतंगांच्या मांज्यांमुळे मोठ्या प्रमाणात पक्षी जखमी होतात. अनेक पक्षांचा मृत्यूही होतो.

दिल्ली अग्नीशामक दलाने(डीएफएस) दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च ते ३०सप्टेंबर दरम्यान त्यांच्याकडे १३ हजार २७१ फोन आले. यातील २ हजार ४३३ पक्ष्यांना वाचवण्यासाठी आलेले तर १ हजार ६१८ प्राण्यांसाठी आले. प्रत्येक महिन्यात डीएफएसला पक्षी व प्राण्यांच्या सुटकेसाठी साधारण १५० ते २०० फोन येतात. मात्र, ऑगस्ट महिन्यात या संख्येत मोठी वाढ होते. यावर्षी ऑगस्टमध्ये डीएफएसला पक्ष्यांसाठी ८८२ फोन आले तर प्राण्यांसाठी ३४५ फोन आल्याची माहिती संचालक अतुल गर्ग यांनी दिली.

प्रामुख्याने कावळा, कबुतर, पोपट या पक्ष्यांच्या सुटकेसाठी डीएफएसला फोन येतात. हे पक्षी विद्युत तारांना किंवा पतंगांच्या मांज्याला अडकलेले असतात. कधी-कधी गाय, श्वान, मांजर यासारखे प्राणी एखाद्या गटारीमध्ये किंवा अरूंद जागेत अडकल्याचे प्रकार होतात. अशा प्राण्यांच्या सुटकेसाठीही नागरिक डीएफएसला बोलावतात. अशा प्राणी-पक्ष्यांच्या सुटकेसाठी ४-५ कर्मचाऱ्यांसह एक वाहन घटनास्थळी पाठवले जाते. त्यांची सुटका केल्यानंतर उपचाराची आवश्यकता असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते.

आठवड्यापूर्वीच(२८ सप्टेंबर) रोहीणीच्या सेक्टर २१ मधून डीएफएसला एक फोन आला होता. गटारीमध्ये पडलेल्या गायीला वाचवण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षातून हा फोन आला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने डीएफएसच्या जवानांना गायीची सुटका केली, अशी माहिती गर्ग यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details