दिल्ली विधानसभा निवडणूक: मनीष सिसोदीया आज उमेदवारी अर्ज भरणार - मनिष सिसोदिया
मनीष सिसोदिया पटपडपंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सिसोदिया उमेदवारी अर्ज भरण्याआधी मंदिरामध्ये पूजा करणार आहेत, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरणार आहेत.
मनीष सिसोदीया
नवी दिल्ली -राजधानीमध्ये विधानसभा निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आज (गुरुवार) नामांकन अर्ज भरणार आहेत. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत पदयात्रा काढली. पदयात्रेदरम्यान सिसोदिया यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी चर्चा केली.