लखनौ - दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातचे प्रमुख मौलान साद यांच्या उत्तर प्रदेशातली फार्म हाऊसवर छापा मारला आहे. राजधानी दिल्लीत झालेल्या मरकज तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमानंतर देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. मात्र, पोलिसांना अजूनही त्यांचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे शामली जिल्ह्यातील कांधला गावातील साद यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला.
तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्या फार्महाऊसवर पोलिसांचा छापा - मौलाना साद न्यूज
यावेळी पोलिसांनी फार्म हाऊसवर राहणाऱ्या व्यक्तींची तब्बल एक तास चौकशी केली. मात्र, माध्यमांशी चर्चा न करताच निघून गेले.
यावेळी पोलिसांनी फार्म हाऊसवर राहणाऱ्या व्यक्तींची तब्बल एक तास चौकशी केली. मात्र, माध्यमांशी चर्चा न करताच निघून गेले. मौलाना साद व्हिडिओ टेपद्वारे संदेश प्रसारित करत आहेत. मात्र, त्यांचा पत्ता अजून पोलिसांनी लागलेला नाही.
मौलान साद यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील कांधला येथील त्यांच्या फार्महाऊसवर छापा मारला. यावेळी दिल्ली पोलिसांनी स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली. कांधला येथे मौलान साद यांची वडिलोपार्जित जमीन असून तेथे त्यांचे आलिशान फार्महाऊस आहे. 5 एप्रिलला येथे साद यांच्या मुलीचा विवाहही होणार होता. मात्र, कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर लग्न रद्द करण्यात आले होते. तसेच मरकज निजामुद्दीन कार्यक्रमानंतर मौलाना साद हे देखील फरार आहेत.