महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार प्रकरणी १६ डिसेंबरला निकाल; भाजप आमदार कुलदीप सेनगर दोषी ठरणार? - bjp mla kuldeep

उन्नावमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणीच्या खटल्यात भाजप आमदार कुलदीप सेनगर मुख्य आरोपी आहे. या खटल्याचा निकाल १६ डिसेंबरला लागणार आहे.

unnav case
कुलदीप सेनगर

By

Published : Dec 10, 2019, 5:53 PM IST

नवी दिल्ली - उन्नावमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणीच्या खटल्यात भाजप आमदार कुलदीप सेनगर मुख्य आरोपी आहे. या खटल्याचा निकाल दिल्ली न्यायालयाने राखून ठेवला आहे. १६ डिसेंबरला न्यायालय बहुचर्चित उन्नाव खटल्याचा निकाल देणार आहे. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.

आमदार कुलदीप सेनगर याने जून २०१७ रोजी नोकरी मागण्यास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप तरुणीने केला आहे. तेव्हापासून पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय न्यायासाठी लढत आहेत. मात्र, आमदार सेनगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यातच २८ जुलै रोजी रायबरेलीवरून माघारी येत असताना पीडितेच्या कारचा आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघात नसून कुलदीप सेनगर यांनी घातपात केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर पीडिता आणि तिचे वकील थोडक्यात बचावले होते.

या खटल्यात सीबीआयने कुलदीप सेनगर त्यांचा ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमी अवस्थेत पीडितेला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ सप्टेंबरला तिला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. तसचे कुटुंबीयांच्या मागणीनुसार पीडितेच्या कुटुंबीयांची दिल्लीमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती.

याप्रकरणी सीबीआयने तपास केला असून कुलदीप सेनगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली न्यायालयाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला आहे. आता १६ डिसेंबरला या प्रकरणी निकाल लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details