नवी दिल्ली -काँग्रेसच्या माजी नगरसेविका इशरत जहाँ यांना दिल्ली उच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. विवाह करण्यासाठी जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांच्यावर अवैध कायवाया प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल असून त्या तुरुंगात आहेत.
माजी काँग्रेस नगरसेविकेला विवाहासाठी दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर - interim bail to Ishrat Jahan
फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत जातीय दंगली भडकल्या होत्या. यावेळी अवैध आणि दहशतवादी कारवायांत करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली होती.

फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत जातीय दंगली भडकल्या होत्या. यावेळी अवैध आणि दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधिश धर्मेंद्र राणा यांनी 10 जून ते 19 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे.
जामीनावर असताना पुरावे आणि साक्षीदारांना प्रभावित न करण्याची ताकीद न्यायालयाने इशरत जहाँला दिली आहे. एस. के शर्मा आणि ललित वलिच्छा यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानुसार 2018 साली लग्न ठरल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यानुसार 12 जूनला विवाहची तारीख आहे, असे म्हटले आहे.