नवी दिल्ली -एका 11 वर्षीय मुलाचे अपहरण करुन खून केल्याप्रकरणी न्यायलयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 2009 साली घडली होती. त्यावर आज दिल्ली न्यायालयाने अंतिम सुनावणी करत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करत 60 हजारांचा दंड ठोठावला आहे.
जीवन नागपाल (वय 32 वर्षे), असे त्या आरोपीचे नाव असून ही शिक्षा सुनावताना या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा अपूरी असून त्याला फाशीचीच शिक्षा देणे गरजेचे आहे, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजी आनंद हे म्हणाले.
याबाबत युक्तीवाद करताना मूळ तक्रारदाराचे वकील प्रशांत दिवाण म्हणाले, 18 मार्च, 2008 रोजी आरोपीने खंडणीसाठी 11 वर्षीय चिमुकल्याचे अपहरण केले होते. अपरहणानंतर त्याने त्याच्या वडिलांकडे खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास मुलाला ठार मारण्यात येईल अशी धमकीही दिली होती. खंडणीची रक्कम न मिळाल्याने आरोपी जीवन नागपाल याने जॅकच्या टॉमीने मारहाण करण्यास सुरुवाती केली. तो लहान असल्याने याला प्रतिकार करू शकला नाही. यात त्याचा जीव गेला. त्यानंतर त्याचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला होता. चिमुकल्याला ठार मारल्यानंतरही आरोपी मृताच्या वडीलांकडे खंडणीची मागणी करत होता.
हेही वाचा -मध्ये प्रदेशातील तृतीयपंथीयाने सर केले 'वर्जिन शिखर'