नवी दिल्ली - तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून जाळून मारल्याची घटना घडली आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीमध्ये लोक रस्त्यांवर उतरले असून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत आहेत. यावेळी निदर्शने करत असलेल्या अनु दुबे नावाच्या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी महिला आयोगाने पोलीस उपायुक्तांना नोटीस बजावली आहे.
डॉ. महिला बलात्कार व हत्या प्रकरणी निदर्शन करणाऱ्या तरुणीला पोलिसांकडून अटक, महिला आयोगाची नोटीस - Anu Dubey
तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून जाळून मारल्याची घटना घडली आहे.

ससंद भवनासमोर अनु दुबे नावाची विद्यार्थींनी सरकारविरोधात प्रदर्शन करत होती. यावेळी तीला पोलिसांनी अटक केली आणि तीला संसदभवनासमोरील ठाण्यात 4 तास ठेवण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी तिला मारहाण केली आणि अत्याचार केले, असेही अनु दुबे हिने सांगितले आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या विद्यार्थिनीच्या तक्रारीची दखल घेत पोलिस उपायुक्तांना नोटीस बजावली आहे. 'कोणत्या गुन्ह्याप्रकरणी अनु दुबेला अटक करण्यात आली आणि तिच्यावर कोणत्या गुन्ह्याखाली एफआयआर नोंदविण्यात आला, याबाबत महिला आयोगाने स्पष्टीकरण मागितले आहे. याचबरोबर महिला आयोगाने दिल्ली पोलिसांकडून एफआयआरची प्रतही मागितली आहे.