महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#दिल्ली हिंसाचार : आम आदमी पक्षाचा नेता दोषी आढळल्यास त्याला दोन वेळा शिक्षा द्या

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारात ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याचे जाहीर केले. तर दिल्ली हिंसाचारामध्ये आपचा नेता दोषी आढळल्यास त्याला दोन वेळा शिक्षा द्या, असेही केजरीवाल पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

By

Published : Feb 27, 2020, 7:05 PM IST

Updated : Feb 27, 2020, 7:35 PM IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारात ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याचे जाहीर केले. तसेच जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये देणार असल्याचे सांगतिले. तर दिल्ली हिंसाचारामध्ये आपचा नेता दोषी आढळल्यास त्याला दोन वेळा शिक्षा द्या, असेही केजरीवाल पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

हिंसेवर राजकारण करू नका, जो कोणी दोषी असेल त्यांना शिक्षा द्या. आम आदमी पक्षाच्या अंतर्गत पोलीस नाहीत. त्यामुळे मी कारवाई करू शकत नाही. या हिंसेमध्ये कोणीही दोषी असेल, मग त्यात आम आदमी पक्षाचा नेता जर दोषी असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे केजरीवाल पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

दरम्यान, एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी आम आदमी पक्षाचा नेता ताहीर हुसैन यांच्यावर हत्येचा आरोप लावला आहे. गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांची दिल्लीतील हिंसाचारादरम्यान हत्या झाली. आपचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्या इमारतीतील लोकांनी दगडफेक केल्याने आपला मुलगा ठार झाला असल्याचा आरोप अंकित शर्मा यांच्या वडिलांनी केला. मात्र, ताहीर हुसेन यांनी हा आरोप फेटाळून लावला असून घाणेरड्या राजकारणात आपल्याला ओढले जात असल्याचे म्हटले आहे.

ईशान्य दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात मृतांचा आकडा वाढून 36 झाला आहे. पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कडेकोट बंदोबस्त संवेदनशील भागांमध्ये ठेवण्यात आला आहे. सीएए समर्थक आणि सीएएला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी हिंसाचार पसरला होता.

हेही वाचा -#दिल्ली हिंसाचार : आयबी अधिकारी हत्याप्रकरणी आप नेत्याचा सहभाग असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Last Updated : Feb 27, 2020, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details