नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत कामगार वर्ग आहे. यामध्ये प्रामुख्याने हरियाणा, बिहार, उत्तरप्रदेश राज्यातील कामगार नागरिकांचा समावेश आहे. तसेच इतर राज्यातीलही कुशल, अकुशल कामगार दिल्लीत आहेत. या सर्वांना आता घरी जाण्याची आस लागली आहे. 14 दिवसांचा लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये अनेक अफवा पसरत आहेत. मात्र, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका. तुमची सगळी जबाबदारी आमची आहे, असे म्हणत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्थलांतरीत कामगारांना विश्वास दिला.
अफवांवर विश्वास ठेऊ नका, स्थलांतरीत कामगारांना केजरीवाल यांचे आवाहन - covid update
घरी जाण्याची घाई करू नका. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका. सगळेजण एकाचवेळी घरी जाण्यासाठी निघाले तर देशापुढे संकट उभे राहील - केजरीवाल
अनेक जण तुम्हाला पैशाच्या मोबदल्यात गावी घेऊन जाण्याचे अमिष दाखवतील, दिल्ली परिवहन विभागाच्या बसे अमुक एका ठिकाणी उभ्या आहेत, त्या गावी नेतील, अशा अफवा कामगारांमध्ये पसरत आहेत. मात्र, कोणतीही बस सुरू नाही, कोणीही तुम्हाला गावी नेऊ शकणार नाही, घरामध्येच सुरक्षित रहा, दिल्ली सरकारने तुमच्या खाण्या-पिण्याची चोख व्यवस्था केली आहे. काहीही अडचण आली तर दिल्ली सरकार आहे, मी आहे, असे म्हणत केरजरीवालांनी स्थलांतरीत मजूर आणि कामगारांना घरातच राहण्याची विनंती केली.
घरी जाण्याची घाई करू नका. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका. सगळेजण एकाचवेळी घरी जाण्यासाठी निघाले तर देशापुढे संकट उभे राहील. त्यामुळे घरातच सुरक्षित रहा, असे आवाहन केजरीवाल यांनी स्थलांतरीतांना केले.