महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांचे 'चलो दिल्ली' आंदोलन; पाहा LIVE अपडेट्स.. - दिल्ली चलो आंदोलन

Delhi Chalo protest of Farmers LIVE Update
कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांचे 'चलो दिल्ली' आंदोलन; पाहा LIVE अपडेट्स..

By

Published : Nov 26, 2020, 8:08 AM IST

Updated : Nov 26, 2020, 8:00 PM IST

19:54 November 26

आंदोलक शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्या; माजी पंतप्रधान देवेगौंडाची विनंती

दिल्लीवर शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्च्यावेळी शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला जात आहे, त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच्या या संघर्षाचे संघर्षाची चित्र पाहून मला फार त्रास झाला आहे. मी केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांशी सन्मानपूर्वक वागावे. कृपया त्यांच्याशी संवाद साधा, त्यांचे ऐकून घ्या. पोलीस दल  त्यांच्या समस्या सोडवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान एचडी देवे गौडा यांनी दिली आहे.

18:41 November 26

मी शेतकऱ्यांना आंदोलनासाठी भडकवले नाही; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे खट्टरांना उत्तर

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा आरोप आहे, की आम्ही शेतकऱ्यांना आंदोलनासाठी भडकवण्याचे काम केले. मात्र, हे साफ चुकीचे असल्याचे मत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी व्यक्त केले आहे. हरियाणातील शेतकरी आंदोलन करत मग त्यांना मी भडकवत आहे का? आज पंजाबमध्ये होत आहे. उद्या हरियाणामध्ये होईल. हे शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरणेतून केले आंदोलन आहे. त्यांचा कृषी कायद्याविरोधात राग या आंदोलनातून व्यक्त होत असल्याचे मत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केले.

विरोध करने हा लोकांना लोकशाहिने दिलेला अधिकार आहे. संविधानाने त्यांना हा अधिकार दिला असेल तर त्यांना तुम्ही का अडवत आहात. असा सवाल ही कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी विचारला आहे.


 

17:29 November 26

हरियाणा पोलिसांनी पंजाबमधील आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा मारा केला आहे. 

17:01 November 26

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्राबर दबाव आणायला हवा...

सुखबीर सिंह बादल  यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर दबाव खूप महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांना हवे असल्यास ते शेतकऱ्यांच्या गोष्टी सोडवू शकतात. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत जाऊन केंद्राबरोबर बैठक घेऊन दबाव आणायला पाहिजे होता. तसेच, मला हरियाणाच्या शेतकर्‍यांना आवाहन करायचे आहे की त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांना या आंदोलना पाठिंबा द्यायला हवा असे आवाहनही एसएडीचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी केले.


 

16:57 November 26

शेतकऱ्यांना आमचे पूर्ण सहकार्य आहे. शेतकऱ्यांनी एक दृछ निश्चय केला आहे की ते कोणत्याही राजकीय झेंड्याखाली येऊन आंदोलन करणार नाहीत. या ठिकाणी आज सर्वच पक्षाचे शेतकरी या आंदोलनात सहभागी आहेत. आमच्या पक्षाच्या वतीने जो आदेश देण्यात येईल त्याचे आम्ही पालन करणार आहोत, अशी माहिती पंजाबच्या शिरोमनी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी आज या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर दिली.


 

16:31 November 26

शेतकरी मोर्चा अडवण्यासाठी हरियाणा पोलिसांकडून पाण्याचा मारा करण्यात येत आहे. 

16:29 November 26

दिल्ली हरियाणा सीमेवर पोलीस सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत.

15:53 November 26

जनविरोधी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने

केंद्र सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत येत आहे. कृषी विधेयकाला मंजुरी ही सर्व नियम धाब्यावर बसवून घेतली आहे. शिवाय कामगार कायद्याने अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. सरकारच्या या धोरणांना विरोध करीत  शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

15:33 November 26

दिल्ली गुडगाव सीमेवरती वाहनांच्या रांगा, वाहनांची तपासणी केली जात असल्याने वाहतूक कोंडी वाढली.

15:25 November 26

..तर मी राजकारण सोडतो; हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी कॅप्टन अमरिंदरसिंहांना सुनावले

"कॅप्टन अमरिंदर सिंह, मी हे पुन्हा सांगत आहे, एमएसपीबाबत भविष्यात काही काही अडचण आल्यास मी राजकारण सोडतो. मात्र, तुम्ही निरपराध शेतककऱ्यांना भडकावण्याचे काम थांबवा. मी गेल्या तीन दिवसांपासून आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. पण दुर्दैवाने आपण संपर्काबाहेर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रत्युत्तर हरियाणाचे मुख्यमंत्री एम.एल. खट्टर यांनी दिले आहे.,

तुमच्या खोट्या प्रचार आणि फसवणुकीची वेळ आता संपली आहे.  कृपया कोरोना सारख्या महामारीत लोकांच्या जीवाशी खेळ खेळणे बंद करा, मी तुम्हाला विनंती करतो. किमान अशा महामारीच्या काळात तरी राजकारण करू नका, अशी टीका मुख्यमंत्री खट्टर यांनी केली आहे.

15:00 November 26

हरियाणा सरकारचा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंहांकडून निषेध

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होऊन दिल्लीकडे कूच करण्यापासून रोखल्या प्रकरणी हरियाणा सरकारचा निषेध केला आहे.  मनोहर लाल खट्टर यांची सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाला का रोखत असा सवाल सवाल मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केला आहे.

14:55 November 26

शेतकऱ्यांच्या चलो दिल्लीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली नोयडा या ठिकाणी कालिंदी कुंज येथे वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे यामहामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

14:48 November 26

दिल्ली हरियाणा सीमेवर नाकाबंदी; ड्रोनद्वारे पाळत, तर वाहनांची कसून तपासणी

शेतकऱ्यांच्या  दिल्ली चलो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हरियाणा सीमेवरील सिंहु येथे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आंदोलनावर लक्ष ठेऊन आहेत. मात्र, या दिशेने शेतकऱ्यांचा कोणताही गट येत नसल्याची माहती डिसीपी यांनी दिली. या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

13:31 November 26

अंबालामधील बॅरिकेट तोडून आंदोलक पुढे..

दिल्लीला निघालेल्या आंदोलकांना अडवण्यासाठी पोलिसांनी सदोपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावले होते. मात्र, त्यांनाही तोडत हे आंदोलक आता पुढे निघाले आहेत..

13:09 November 26

हरियाणाच्या कर्नाल तलाव परिसरात शेतकऱ्यांची गर्दी..

हरियाणाच्या कर्नाल तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होत आहेत. याठिकाणी एकत्र येऊन पुढे दिल्लीकडे कूच करण्याचा आंदोलकांचा मानस आहे. यावेळी शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी लाऊडस्पीकरवरुन त्यांना परत फिरण्याचे आवाहनही केले. त्यानंतरही आंदोलक मागे न हटल्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराचाही वापर केला.

11:46 November 26

आंदोलकांनी पोलिसांवर केली दगडफेक..

पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली पहायला मिळाली. 

11:10 November 26

हरियाणाच्या सीमेवर आंदोलकांवर पाण्याचा मारा..

हरियाणाच्या सीमेवर आंदोलकांवर पाण्याचा मारा..

हरियाणाच्या अंबालामध्ये आंदोलनासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. शेतकऱ्यांना दिल्लीस जाण्यापासून पोलीस अडवत आहेत. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत.

11:09 November 26

पोलिसांकडून ड्रोनचा वापर..

पोलिसांकडून ड्रोनचा वापर..

शेतकरी आंदोलनासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर केला जातो आहे..

09:07 November 26

दिल्ली-फरीदाबाद सीमेवर सुरक्षा वाढवली..

दिल्ली-फरीदाबाद सीमेवर सुरक्षा वाढवली..

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-फरीदाबाद सीमेवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. फरीदाबाद पोलिसांना असे निर्देश देण्यात आले आहेत, की शेतकरी संघटनांच्या एकाही सदस्याला आज आणि उद्या दिल्लीमध्ये प्रवेश देऊ नये.

07:50 November 26

करनालपर्यंत पोहोचतायत आंदोलक; रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..

करनालपर्यंत पोहोचतायत आंदोलक; रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..

अंबाला, कुरुक्षेत्रमार्गे आता हे आंदोलक शेतकरी करनालपर्यंत पोहोचत आहेत. तेथून ते पुढे दिल्लीकडे जातील. मोठ्या प्रमाणात आलेल्या आंदोलकांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

07:39 November 26

हरियाणा-पंजाब सीमा बंद..

या आंदोलनास विरोध म्हणून हरियाणा सरकारने पंजाब सीमा बंद केल्या आहेत. हरियाणाचे परिवाहन मंत्री मूलचंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन राज्यांदरम्यानची बससेवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम लक्षात घेता, एवढ्या मोठ्या जनसमुदायाला आम्ही पुढे जाऊ शकत नाही.

07:37 November 26

राजीव गांधी एज्युकेशन सिटीमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात..

राजीव गांधी एज्युकेशन सिटीमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात..

हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी हरियाणामधील राजीव गांधी एज्युकेशन सिटीमध्ये एकत्र येणार आहेत. त्यानंतर हे सर्व एकत्रितपणे दिल्लीकडे कूच करतील. या पार्श्वभूमीवर राजीव गांधी एज्युकेशन सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

06:22 November 26

कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांचे 'चलो दिल्ली' आंदोलन..

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटना दिल्लीकडे कूच करत आहेत. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटना आज आणि उद्या दिल्लीमध्ये केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार आहेत. यासाठी ‘दिल्ली चलो’चं आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे..

Last Updated : Nov 26, 2020, 8:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details