नवी दिल्ली- दिल्लीतील भाजपचे माजी अध्यक्ष मोहन गर्ग यांचे आजारपणामुळे निधन झाले. आजारी असल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडे सात वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या परिवाराने दिली.
दिल्लीतील भाजपचे माजी अध्यक्ष मोहन गर्ग यांचे निधन - जे.पी नड्डा
मोहन गर्ग यांचे पार्थिव अशोक विहार येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. साडे अकरापर्यंत लोकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल.
मोहन गर्ग यांचे पार्थिव अशोक विहार येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. साडे अकरापर्यंत लोकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. यानंतर त्यांच्या पार्थिवाला दिल्ली येथील भाजप मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. येथे बारा ते एक वाजेपर्यंत लोकांना त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर गर्ग यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा देह रुग्णालयाला दान देण्यात येणार आहे.
दरम्यान, गर्ग यांच्या जाण्याने पक्षाची कधीही भरुन न येणारी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. या दु:खद परिस्थितीत आपन गर्ग यांच्या परिवाराच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. २००३ साली मोहन गर्ग हे दिल्ली विधानसभेत निवडून आले होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात.