नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. तर भाजपला पूर्णपणे नाकारले आहे. भाजपने मनोज तिवारी यांच्या नेतृत्त्वाखाली जोरदार प्रचार केला. मात्र, जनतेने भाजपला नाकारले आहे. निवडणुकीतील पराभवानंतर मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले. दिल्लीच्या जनतेसाठी केजरीवाल काम करतील, असे म्हणत जनादेश मान्य केला.
'दिल्लीतील पराभवाची समीक्षा करू, जनादेश आम्हाला मान्य' - दिल्लीत भाजपचा पराभव
दिल्लीची स्थिती वाईट आहे. जवळपास ४८ मतदार संघात वाईट स्थिती आहे. त्यामुळेच जनता भाजपला मतदार करेल, अशी आशा होती. मात्र, तसे झाले नाही - मनोज तिवारी

'आमच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, पराभवाची समीक्षा करू. निकाल आपल्या बाजूने नसेल तर निराशा होते, पण धीराने काम करा. भाजपच्या मतांची टक्केवारी कार्यकर्त्यांमुळेच वाढली, असे म्हणत तिवारी यांनी कार्यकर्यांना प्रोत्साहन दिले. काँग्रेस दिल्लीतून लुप्त झाली असून त्यांच्या मतांची टक्केवारी घटली आहे. दिल्लीत आरोप प्रत्यारोप कमी आणि काम जास्त होईल याची आम्ही काळजी घेऊ. भाजपने द्वेषाचे राजकारण केले नाही, सबका साथ सबका विकास हेच उद्दिष्ट ठेवले होते. शाहीन बाग आंदोलनाच्या आम्ही विरोधातच आहोत. रस्ता रोखणे चुकीचे आहे, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.
दिल्लीची स्थिती वाईट आहे. जवळपास ४८ मतदार संघात वाईट स्थिती आहे. त्यामुळेच जनता भाजपला मतदार करेल, अशी आशा होती. मात्र, तसे झाले नाही. माझा अंदाज चुकला. निकालावर सर्वजण एकत्र बसून चिंतन करणार आहोत. ८ टक्के मते वाढली म्हणजे आम्हाला लोकांनी नाकारले नाही. आम्ही ईव्हीएमला दोष देत नाही, जनादेश आम्हाला मान्य आहे. शाहीनबागेत केजरीवाल यांनी जावे आणि तिथल्या लोकांना समजावून सांगावे, असेही तिवारी म्हणाले.