महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभेत कोरोनाची 'एंट्री', अध्यक्षांचे सचिव 'पॉझिटिव्ह' - दिल्ली विधानसभा महत्त्वाची बातमी

उपराज्यपाल सचिवालय म्हणजे राजनिवास, दिल्ली सचिवालय जेथून दिल्ली सरकारचे कामकाज चालते, तेथेही कोरोना संक्रमित कर्मचारी आढळल्याने अनेक कार्यालये सील आहेत. आता दिल्ली विधानसभेतही कोरोनाचे संक्रमण पोहोचल्यामुळे तेथील मुख्य कार्यालय पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे.

दिल्ली विधानसभेत कोरोनाचा प्रवेश
दिल्ली विधानसभेत कोरोनाचा प्रवेश

By

Published : Jun 6, 2020, 8:28 AM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचे संक्रमण आता दिल्ली विधानसभेतही पोहोचले आहे. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांचे सचिव कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. यानंतर संपूर्ण कार्यालय सील करण्यात आले आहे.

दिल्ली विधानसभेत कोरोनाचा प्रवेश
28 मे रोजी सचिवांना जाणवली तापाची लक्षणेदिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांचे सचिव कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. मागील 11 दिवसांपासून ते विधानसभेत आले नव्हते. 28 मे रोजी त्यांना तापाची लक्षणे जाणवली. तेव्हापासून ते घरातच विलगीकरणात आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असा संशय आल्यानंतर त्यांनी चाचणी करून घेतली. याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल आल्यानंतर विधानसभेचा मुख्य परिसर, विधानसभा अध्यक्षांचे कार्यालय, अध्यक्ष आणि त्यांच्या सचिवांचा वावर असलेली अन्य ठिकाणे पूर्णपणे सील केली आहेत.
दिल्ली विधानसभेत कोरोनाचा प्रवेश
कार्यालयातील सर्व 26 कर्मचाऱ्यांची झाली चाचणीविधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या 26 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल येण्याचे बाकी आहे. ते येईपर्यंत विधानसभा अध्यक्षांचे कार्यालय पूर्ण सील ठेवले जाणार आहे.
दिल्ली विधानसभेत कोरोनाचा प्रवेश
उपराज्यपाल सचिवालय म्हणजे राजनिवास, दिल्ली सचिवालय जेथून दिल्ली सरकारचे कामकाज चालते, तेथेही कोरोना संक्रमित कर्मचारी आढळल्याने अनेक कार्यालये सील आहेत. आता दिल्ली विधानसभेतही कोरोनाचे संक्रमण पोहोचल्यामुळे तेथील मुख्य कार्यालय पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details