नवी दिल्ली :लॉकडाऊनमुळे गेले कित्येक महिने उद्योग आणि वाहतूक बंद होती. त्यामुळे राजधानी दिल्लीमधील हवेची गुणवत्ताही धोकादायक पातळीवर न राहता, मध्यम पातळीवर होती. मात्र, पंजाब-हरियाणा राज्यांमध्ये आता पुन्हा पेंढा जाळण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळण्याची शक्यता हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणालीने (सफर) वर्तवली आहे.
रविवारी पंजाब, हरियाणा आणि इतर शेजारी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पेंढा जाळल्याचे दिसून आले. सध्याची हवेची दिशा पाहता, याचा थेट परिणाम दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेवर होऊ शकतो, असे सफरने सांगितले. येत्या दोन दिवसांमध्ये दिल्लीतील हवेची गुणवत्ता ढासळू शकते असा इशाराही सफरने दिला आहे.