नवी दिल्ली - शहरामध्ये पुन्हा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शाहीन बागमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले असून पोलिसांच्या हवाली केले आहे. यावेळी तो म्हणाला देशामध्ये हिंदूचेच चालणार.
दिल्लीतील शाहीन बागमध्ये गोळीबार, 'तो' म्हणाला... 'देशात फक्त हिंदूचेच चालणार' - fired in Shaheen Bagh
शाहीन बागमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव कपील गुर्जर (वय २५) असून तो दल्लुपुरा येथील रहिवासी आहे. लोकांनी त्याला पकडल्यानंतर त्याने जय श्री रामचे नारे लावले आहेत. शाहीन बागेत गोळीबार केल्यानंतर त्याने पिस्तूल फेकून देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहेत.
यापूर्वी गुरुवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान गोळीबार झाला होता. सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीच्या राजघाटपासून विद्यापीठापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू होता. यावेळी एका तरुणाने गोळीबार केला. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला होता.