नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये एका पिझ्झा डिलीव्हरी बॉयला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संपूर्ण हौज खास आणि मालवीय नगर या परिसरातील 89 जणांना होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे. पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर दुकानमालकासह ८९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरुण गुप्ता यांनी दिली.
पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर ८९ जण क्वारंटाईन दरम्यान, डिलिव्हरी बॉयने ज्या ७२ घरी ऑर्डर पोहोचवली होती, ती सर्व घरे सील करण्यात आली आहेत. ही सर्व घरे मालवीय नगरपासून ४ ते ५ किलोमीटर परिसरातील असल्याची माहिती आहे.
कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन दिवसांपूर्वी एका दिवशी ३५६ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे दिल्ली सरकार अधिक खबरदारी घेत आहे.
आता एका पिझ्झा डिलीवरी बॉयला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या 89 जणांना क्वारंनटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षणे आढळल्यास त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे, असे दक्षिण दिल्लीचे जिल्हाधिकारी बी. एन. मिश्रा यांनी सांगितले.