हैदराबाद- मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद मधील तेलंगणा मराठा मंडळाच्या शिष्टमंडळाने मेहबुबनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तेजस पवार यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तेजस पवार हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या सौंदणे गावचे रहिवासी आहेत. गेल्यावर्षी ते मेहबुबनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले.
तेलंगणा मराठा मंडळाच्या वतीने मराठमोळे अधिकारी तेजस पवार यांचा शाल व पुप्षगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, निवास निकम, मदन पाटील, लक्ष्मीकांत शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पवार यांनी सातारा सैनिक शाळेतून शिक्षण पूर्ण केले त्यांची 'एनडीए'मध्ये निवड झाली होती. मात्र त्यांनी ती संधी सोडुन युपीएससी परिक्षेत यश मिळवले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी 576 वे स्थान प्राप्त केले होते. त्यासाठी त्यांनी केलेला अवघड प्रवास युवकांना प्रेरणादायी ठरला आहे.