पणजी -डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 16 भारतीय कंपन्यांबरोबर तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी 30 करार केले आहेत. यामध्ये 3 स्टार्टअपचा समावेश आहे. गोव्यात 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान आयोजित 'व्हायब्रंट गोवा' जागतिक प्रदर्शन आणि शिखर परिषदे दरम्यान हे करार करण्यात आले.
तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत डीआरडीओने केले 30 करार - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था लेटेस्ट न्यूज
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 16 भारतीय कंपन्यांबरोबर तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी 30 करार केले आहेत. ही संस्था सशस्त्र दलांसाठी तंत्रज्ञान विकसित करते. हे तंत्रज्ञान संरक्षण उद्योगाकडे हस्तांतरीत केले जाते.
हेही वाचा -भारतातील पहिल्या 'आयर्नमॅन' स्पर्धेत भारतीय सेनेचे विश्वजीत सिंग साइखोम अव्वल
डीआरडीओ ही संस्था सशस्त्र दलांसाठी तंत्रज्ञान विकसित करते. हे तंत्रज्ञान संरक्षण उद्योगाकडे हस्तांतरीत केले जाते. भारतीय सशस्त्र दलांना संरक्षण क्षेत्रातल्या या उद्योगांकडून ‘रेडी टू इट जेवण’ आणि इतर जीवनावश्यक सुविधा पुरवल्या जातात. लहरी हवामानात तग धरण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांना ही उत्पादने उपयोगी पडतात. या उत्पादनांचे पोषण मूल्य उच्च दर्जाचे असते. शिवाय ते खराब न होता अनेक महिने टिकते.