महाराष्ट्र

maharashtra

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज 'आत्मनिर्भर भारत' सप्ताहाचा शुभारंभ करणार

By

Published : Aug 10, 2020, 10:17 AM IST

राजनाथ सिंह आज 'आत्मनिर्भर भारत' सप्ताहाचा शुभारंभ करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 3.30 वाजता होईल.पंतप्रधानांनी "गंदगी भारत छोडो" हाक दिल्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला नवी दिशा व गती मिळेल, असे राजनाथ सिंह एका कार्यक्रमात म्हणाले.

Rajnath Singh
राजनाथ सिंह

नवी दिल्ली-संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज 'आत्मनिर्भर भारत' सप्ताहाचा शुभारंभ करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 3.30 वाजता होईल, असे संरक्षणमंत्री यांच्या कार्यालयाने रविवारी रात्री ट्विट द्वारे कळवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 'आत्मनिर्भर भारत' ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येईल. अन्न, वस्त्र, निवारा तसेच शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत आपला देश आत्मनिर्भर असेल, असे राजनाथ सिंह यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले.

चंपारण सत्याग्रहाच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये नवीन भारताच्या(न्यू इंडिया) निर्मितीची घोषणा केली. जेव्हा आपण नवीन भारताची पायाभरणी करतो, तेव्हा आत्मविश्वास आवश्यक असतो. पंतप्रधानांनी हे स्पष्ट केले आहे, असे सिंह यांनी नमूद केले.

2024 पर्यंत हलकी लढाऊ हेलिकॉप्टर, वाहतूक विमान, पारंपारिक पाणबुडी आणि नौकावरील क्षेपणास्त्रांसह १०१ शस्त्रे इत्यादीच्या आयातीवर निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. हा निर्णय देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी घेतला गेला आहे.

पंतप्रधानांनी "गंदगी भारत छोडो" हाक दिल्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला नवी दिशा व गती मिळेल, असे राजनाथ सिंह एका कार्यक्रमात म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details