नवी दिल्ली -केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ७ ऑक्टोबरला पॅरिस दौऱ्यावर जाणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर राजनाथ सिंह पॅरिसमध्ये शस्त्राची पुजा करणार आहेत. राफेल लढाऊ विमानाचा पहिला ताफा या महिन्यात भारतामध्ये येणार आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पॅरिसमध्ये करणार शस्त्रपूजा - राजनाथ सिंह पॅरिसमध्ये शस्त्राची पुजा करणार
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ७ ऑक्टोबरला पॅरिस दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी दसऱ्याच्या मुहूर्तावर राजनाथ सिंह पॅरिसमध्ये शस्त्राची पुजा करणार आहेत.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ
राजनाथ सिंह ७ ऑक्टोबरला तीन दिवसीय दौऱ्यासाठी फ्रान्सला रवाना होतील. ८ ऑक्टोबरला हवाईदलाच्या स्थापन दिनी फ्रान्स भारताला पहिले राफेल विमान देणार आहे. राफेल विमान घेतल्यानंतर राजनाथ सिंह फ्रान्स सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेणार आहेत.
2016 मध्ये फ्रान्ससोबत भारताने ५८ हजार कोटींचा ३६ लढाऊ राफेल विमानांचा करार केला होता. राफेल लढाऊ विमाने खरेदी प्रकरणी विरोधकांनी सरकारवर सतत टीका केली आहे.