नवी दिल्ली - जगातील क्रमांक दोनचा सर्वांत मोठा बर्फाळ प्रदेश सियाचीन हा पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. सोमवारी लडाखमधील श्योक नदीवरील कर्नल चेवांग रिंचेन पुलाच्या उद्घाटनप्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे.
जगातील क्रमांक दोनचा सर्वांत मोठा बर्फाळ प्रदेश पर्यटनासाठी खुला, राजनाथ सिंह यांची घोषणा - Siachen area is now open tourists & tourism
जगातील क्रमांक दोनचा सर्वांत मोठा सियाचीन बर्फाळ प्रदेश हा पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.
![जगातील क्रमांक दोनचा सर्वांत मोठा बर्फाळ प्रदेश पर्यटनासाठी खुला, राजनाथ सिंह यांची घोषणा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4826633-139-4826633-1571671107730.jpg)
दरम्यान सप्टेंबर महिन्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सियाचीन पर्यटनासाठी खुलं करण्यात येणार असून त्यावर विचार सुरू असल्याचं ते म्हणाले होते. सियाचीनची सफर करताना आपले सैन्य बिकट वातावरणात कशा प्रकारे डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेचे रक्षण करतात. हे नागरिक जवळून पाहतील, असे रावत म्हणाले होते.
सामान्यतः उणे 45 ते 60 अंश सेल्सिअस तापमानात अत्यंत आव्हानात्मक स्थितीत आपले सैन्य तिथे तैनात असते. समुद्रसपाटीपासून ११,००० हजार फुटांवर असलेल्या बर्फाळ प्रदेशामधील सियाचीन बेस कँम्पपर्यंत जाण्यासाठी भारताने सन २००७ पासून गिर्यारोहकांना परवानगी दिली आहे.