नवी दिल्ली -भारत-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील लष्कराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी पूर्व लडाखचा दौरा करण्याची शक्यता आहे. गलवान व्हॅलीतील धुमश्चक्रीनंतर सीमेवर अजूनही तणाव आहे. हा तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच नियंत्रण रेषेवर अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा कुटिल डाव चीनकडून सुरू आहे.
लडाख भेटीत संरक्षण मंत्री लष्करातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोरे, पाँगयाँग त्सो लेक, डेपसांग प्लेन, श्योक नदी अशा अनेक भागात चीनने अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. दोन्ही देशांमधील सीमेवरील शांततेच्या करारांच्या विरोधात असल्याचे भारताने म्हटले आहे.