बंगळुरू- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस या अत्याधुनिक लढाऊ विमानातून भरारी घेतली आहे. आज बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावरून त्यांनी या विमानाने प्रवास केला. या विमानातून उड्डाण करणारे ते देशातील पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत एअर व्हाईस मार्शल एन. तिवारी होते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची 'तेजस'मधून भरारी - karnataka
बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावरून त्यांनी या विमानाने प्रवास केला. या विमानातून उड्डाण करणारे ते देशातील पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
राजनाथ सिंह यांनी तब्बल ३० मिनिटे या विमानातून प्रवास केला. जुन्या मिग-२१ ला पर्याय म्हणून HAL (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड) ने तेजसची निर्मिती केली होती. तेजस हे स्वदेशी बनावटीचे विमान असून ते वजनाने हलके आहे. १९८० च्या दशकात तेजस या विमानाच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. विशेष म्हणजे, ४ मे २००३ साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाचे नाव तेजस ठेवले होते.
Last Updated : Sep 19, 2019, 10:49 AM IST