महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संरक्षणमंत्री सीतारमण यांनी घेतली अभिनंदन यांची भेट - hospital

वैद्यकीय तपासणीसाठी अभिनंदन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान पाकिस्तानने अभिनंदन यांना वाघा सीमेवर भारतीय वायुसेनेकडे सोपविले.

निर्मला सीतारमण यांनी अभिनंदन यांची भेट घेत चौकशी केली.

By

Published : Mar 2, 2019, 5:02 PM IST

नवी दिल्ली - संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची रुग्णालयात भेट घेतली. अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असून काल (शुक्रवारी) त्यांना भारताकडे सोपवण्यात आले. यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी अभिनंदन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. यामुळे पाकिस्तानच्या वायुदलाने पळ काढला होता. कारवाईदरम्यान भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान जमीनदोस्त केले, तर भारतालाही आपले एक विमान गमवावे लागला. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्यामुळे विमानाचे चालक अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने पकडले होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान अभिनंदन यांना वाघा सीमेवर भारतीय वायुसेनेकडे सोपविण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details