कोलकाता -संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसीय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीम येथील गंगटोक-नाथुला रोडचे सिंह यांच्याहस्ते उद्घाटन झाले. आर्मी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) या लष्कराच्या संस्थेकडून हा रस्ता बांधण्यात आला आहे. दार्जिलिंगच्या सुकना येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राजनाथ यांनी रस्त्याचे उद्घाटन केले. पर्यायी रस्त्याचे उद्घाटन करताना मला अत्यंत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. पूर्व सिक्कीम आणि लष्करातील लोकांची इच्छा पूर्ण झाली असल्याचेही सिंह म्हणाले. १९.३५ किलोमीटरचा हा पर्यायी रस्ता बांधल्यामुळे सिंह यांनी अभिनंदन केले. सिक्कीमच्या सीमांवरील जवळपास अनेक रस्ते बीआरओकडून बांधण्यात येत असल्याची माहितीही सिंह यांनी दिली.
पूर्व सिक्कीममध्ये ६५ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे तसेच अधिक ५५ किलोमीटर रस्ते बनवण्याची योजना आहे. भारतमाला प्रकल्पातंर्गत या रस्त्यांची कामे सुरू असल्याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कामकाज वाखाणण्यासारखे आहे. राज्याच्या प्रमुखांकडून बीआरओला विशेष पाठिंबा मिळाला त्यामुळे ही कामे होऊ शकली असेही सिंह म्हणाले.
पूर्व हिमालय भारतासाठी मोक्याचा