महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

६२ व्या 'डीआरडीओ' दिनानिमित्त संरक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ६२ व्या 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे'च्या ६२ व्या दिनानिमीत्त आपल्या ट्विटर अकाउंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

rajnath singh
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

By

Published : Jan 1, 2020, 12:26 PM IST

नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बुधवारी ६२ व्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच नवीन वर्षात विविध कार्य आणि संशोधन कार्यक्रमात यश मिळवण्याकरता सदिच्छा दिल्या. "६२ व्या डीआरडीओ दिनानिमित्त मी डीआरडीओच्या सर्व कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देतो. डीआरडीओने अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान व प्रणाली विकसित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. या वर्षात डीआरडीओला आणखी उज्वल कामगिरीकरता सदिच्छा", असे सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संरक्षणमंत्र्यांनी देशातील नागरिकांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . 2020 या नववर्षात आपणा सर्वांना आनंद, चांगले आरोग्य व कल्याण मिळो, याच सदिच्छा!" अशा शुभेच्छा सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून केल्या.

नववर्षाच्या आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी भावना व्यक्त केल्या होत्या.

हेही वाचा - 'आम्ही राजकारणापासून खूप लांब राहतो' फक्त सरकारच्या आदेशानुसार काम करतो'

हेही वाचा - शोध मोहिमेदरम्यान काश्मीरमध्ये २ जवान हुतात्मा

ABOUT THE AUTHOR

...view details