शिमला - विषाणूसंसर्ग थांबवण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे हाच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. यासाठी हिमाचल प्रदेशच्या आयुर्वेद विभागाने कोरोना वॉरियर्सची प्रतिकारशक्ती कायम ठेवण्यासाठी आयुर्वेदीक काढा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात कांगडा जिल्ह्यात 8 हजार पाकिटांचे वितरण करण्यात आले आहे.
कोरोना वॉरियर्ससाठी कांगडा जिल्ह्यात आयुर्वेदीक काढ्याचे वितरण जोगिंदरनगर येथील आयुर्वेदिक फार्मसीमध्ये आयुर्वेद विभागाने कोरोना वॉरियर्ससाठी काढा तयार केला आहे. कोरोना संकटात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी आयुर्वेद विभागाने मागविली आहे. वेगवेगळ्या विभागांकडून प्राप्त झालेल्या कर्मचार्यांच्या यादीनुसार आयुर्वेदीक काढा विभागांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
आयुर्वेद विभागानुसार या काढ्यामुळे कोरोना संकटात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची प्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि कोरोना संकटामध्ये ते आपले कार्य करण्यास सक्षम होतील. देशातील निवडक वैद्यांच्या सल्ल्यानुसार हा काढा तयार करण्यात आला आहे.
काढा तयार करताना भारत सरकार आयुष मंत्रालयाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले आहे. हा काढा कोरोना वॉरियर्सना विनामूल्य वितरित केला जात आहे. कांगड़ा येथे तब्बल 8,000 पॅकेट्सची पहिली खेप पाठवण्यात आली आहे. प्रत्येक पॅकेट 75 असून प्रत्येक कोरोना योद्धाला रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी एक पॅकेट देण्यात येत आहे, असे जिल्हा आयुर्वेदिक अधिकारी डॉ. कुलदीप बारवाल यांनी सांगितले.