महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'डॉ. अब्दुल कलामांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषित करा’

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २१ जून हा ‘जागतिक योग दिवस’ आणि ७ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून घोषित केला आहे. त्याप्रमाणे आता १५ ऑक्टोबर हा ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषित करावा, अशी माझी केंद्र सरकारकडे विनंती आहे,' असे रापोलू यांनी म्हटले आहे.

By

Published : Jun 16, 2019, 4:33 PM IST

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

नवी दिल्ली - महान संशोधक आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यसभा खासदार आणि भाजप नेते आनंद भास्कर रापोलू यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री रमेश निशांक यांच्याकडे याविषयी पत्र पाठविले आहे. डॉ. कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबरला असतो.

'अमेरिकेने यापूर्वीच १५ ऑक्टोबर हा डॉ. कलामांचा जन्मदिवस ‘जागतिक विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार, देशभरातील विद्यापीठांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्येही हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. कलाम हे एक आदर्श वैज्ञानिक होते. त्यांच्या प्रेरणेने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता जागृत व्हावी, यासाठी हा प्रयत्न आहे. तेव्हा या दिवसाला 'राष्ट्रीय विद्यार्थी दिवस' म्हणून मान्यता मिळावी,' असे रापोलू यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

रापोलू यांचे पत्र
'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २१ जून हा ‘जागतिक योग दिवस’ आणि ७ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून घोषित केला आहे. त्याप्रमाणे आता १५ ऑक्टोबर हा ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषित करावा, अशी माझी केंद्र सरकारकडे विनंती आहे,' असे रापोलू यांनी म्हटले आहे.

यापूर्वी भाजपने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा विविध प्रकारे गौरव केला आहे. त्यांना राष्ट्रपतीपदावर विराजमान होण्यासाठी भाजपने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, दिल्लीतील एका महत्त्वाच्या मार्गाला मोदी सरकारने डॉ. कलाम यांचे नाव दिले आहे. त्यानंतर आता त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करावा, असे माजी खासदार आणि भाजप नेते आनंद भास्कर रापोलू यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details