महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णय असंवैधानिक - प्रियांका गांधी - jammu kashmir

केंद्र सरकारने ज्या पद्धतीने ३७० कलम हटवले आहे ते पूर्णपणे असंवैधानिक असल्याची टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे.

प्रियंका गांधी

By

Published : Aug 13, 2019, 11:20 PM IST

Updated : Aug 13, 2019, 11:26 PM IST

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने हे कलम हटवले आहे ते पूर्णपणे असंवैधानिक असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने लोकशाहीची सर्व तत्वे पायदळी तुडवली आहेत. अशा गोष्टी करत असताना काही नियम पाळणे गरजेचे असते. मात्र, ते पाळले गेले नाहीत, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय घटना विरोधी असल्याचे म्हटले होते. आता प्रियांका गांधींनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.

Last Updated : Aug 13, 2019, 11:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details