महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण: 'जर मला फाशी झाली तर माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल' - Nirbhaya case convict vinay sharma

न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान संपूर्ण कुटुंबाला त्रास झाल्याचे त्याने विनय शर्माने फेरविचार याचिकेमध्ये म्हटले आहे.

विनय शर्मा
विनय शर्मा

By

Published : Jan 10, 2020, 12:50 PM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषी विनय शर्माने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वकिलांमार्फत त्याने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान संपूर्ण कुटुंबाला त्रास झाल्याचे त्याने याचिकेमध्ये म्हटले आहे.

'फक्त मला जरी शिक्षा होणार असली तरी याची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला मिळाली आहे. माझ्या कुटुंबीयांचा काहीही दोष नसताना त्यांना सामाजिक अवहेलना आणि मानहानी सहन करावी लागली आहे'.

'माझे कुटुंब अतिशय गरीब असून तुटपुंज्या पैशावर जीवन जगत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांच्याकडे आता काहीही शिल्लक राहिले नाही, जर मला मृत्यूदंडाची शिक्षा झाली तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल', असे विनय शर्माने याचिकेमध्ये म्हटले आहे. वरिष्ठ वकील सी. अगरवाल आणि ए. पी सिंह यांनी आरोपीच्या वतीने याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणातील आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फासावर लटकवले जावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर, आरोपींना १४ जानेवारीपर्यंत न्यायिक साधनांचा वापर करण्याची मुभाही न्यायालयाने दिली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींचा न्यायालयात पक्ष मांडणारे वकील ए. पी. सिंह यांनी दिल्ली न्यायालयाच्या निर्वाळ्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी याचिका दाखल केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details