गुवाहाटी - आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू पिल्यामुळे तब्बल ३८ लोकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तसेच जवळपास ३० लोक आजारी पडल्याची माहिती आहे. गोलाघाटच्या सालमोरा येथील टी. एस्टेट येथील ही घटना आहे.
आसाममध्ये विषारी दारू पिल्याने ३८ लोकांचा मृत्यू, अनेक आजारी - assam
गुरुवारी रात्री एका दुकानातून दारू विकत घेऊन प्यायली होती. यानंतर यातील अनेक लोक आजारी पडले होते, असे स्थानिकांनी सांगितले.
गोलाघाटच्या सिव्हिल रुग्णालयात २२ मृतदेह आहेत. आधी मृतांची संख्या १२ होती. मात्र, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्या वाढल्यानंतर मृतांच्या संख्येत वाढ झाली, अशी माहिती अतिरिक्त उपायुक्त धीरज यांनी दिली. येथील अनेक लोकांनी गुरुवारी रात्री एका दुकानातून दारू विकत घेऊन प्यायली होती. यानंतर यातील अनेक लोक आजारी पडले होते, असे स्थानिकांनी सांगितले. अजूनही यातील बरेच जण रुग्णालयात दाखल झालेले नाहीत, असेही सांगितले जात आहे. तसेच पोलीस आणि अवैधरित्या दारू विक्रेत्यांमध्ये मिलीभगत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
प्रशासनाकडून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ४ अधिकाऱ्यांची टीम गठीत करून ३ दिवसांत याविषयीचा तपास अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.