महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतात कोरोनाचे २५८ रुग्ण; मृतांचा आकडा ५ वर - कोरोनाव्हायरस उपचार

महाराष्ट्रात ५२ जणांना तर केरळमध्ये ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली १७, कर्नाटक १५, उत्तरप्रदेश २३, लडाख १०, राजस्थान २३ आणि तेलंगाणात १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना प्रसार
कोरोना प्रसार

By

Published : Mar 21, 2020, 9:46 AM IST

Updated : Mar 21, 2020, 9:53 AM IST

नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या २५८ वर गेली आहे. यामध्ये ३८परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा राज्यात सर्वात जास्त म्हणजे १४ परदेशी नागरिकांना आणि तेलंगाणात ९ जणांना लागण झाली आहे. आज(शनिवारी) राजस्थान राज्यात ६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

इतर राज्यातील परिस्थिती?

महाराष्ट्रात ५२ जणांना तर केरळमध्ये ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली १७, कर्नाटक १५, उत्तरप्रदेश २३, लडाख १०, राजस्थान २३ आणि तेलंगाणात १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २३ नागरिक उपचारानंतर पूर्णतहा: बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातही चार जणांना बाधा झाली आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने एकातंवासात राहणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली जारी केली आहे. १४ दिवस घरातच राहण्याचे संशयितांना सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर शहर कोरोनाच्या जास्त प्रसारामुळे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य यंत्रणा कामाला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. तर अनेक देशांतून भारतात येण्याजाण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशामध्ये तपासणी प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच अनेक संशयितांवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे. परिस्थितीचा आढावा घेवून उपाययोजना राबवण्यात येत आहेत. देशातील छोट्या मोठ्या शहरांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधीत केले. येत्या २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांनी स्वतःहून, स्वतःसाठी संचारबंदी लागू करावी. तसेच आपल्या घरासमोर उभे राहून टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त करावे, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.

Last Updated : Mar 21, 2020, 9:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details