महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळ भूस्खलन : मृतांची संख्या पोहोचली ५५ वर.. - केरळ अपडेट

आतापर्यंत आम्ही ५५ मृतदेहांना बाहेर काढले आहे, तर १२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेणे सुरूच आहे, असे इडुक्कीचे जिल्हाधिकारी दिनेशन यांनी सांगितले.

Death toll in Kerala landslip goes up to 55
केरळ भूस्खलन : मृतांची संख्या पोहोचली ५५ वर..

By

Published : Aug 12, 2020, 8:28 PM IST

तिरुवअनंतपुरम : केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील मुन्नारजवळील झालेल्या भूस्खलनातील बळींची संख्या ५५वर पोहोचली आहे. बुधवारी ढिगाऱ्याखालून तीन मृतदेहांना बाहेर काढल्यानंतर ही संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भूस्खलन झाल्यानंतर सहावा दिवशीही एनडीआरएफचे बचाव पथक येथे कार्यरत आहे. आणखी १५ बेपत्ता लोकांचा शोध हे पथक घेत आहे. आतापर्यंत आम्ही ५५ मृतदेहांना बाहेर काढले आहे, तर १२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेणे सुरूच आहे, असे इडुक्कीचे जिल्हाधिकारी दिनेशन यांनी सांगितले.

सात ऑगस्टला झालेल्या या भूस्खलनात २० रो-हाऊसेस नष्ट झाली होती. या घरांमधून ८२ कामगार आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. त्यानंतर सहा दिवसांनंतरही विविध बचाव पथके त्यांना काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details