नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढून ४२ झाला आहे. गंभीर जखमी असेलल्या नागरिकांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी अनेक भागांत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
दिल्ली हिंसाचार: मृतांचा आकडा ४२ वर, काँग्रेस प्रतिनिधींची हिंसाचारग्रस्त भागाला भेट - delhi Violence
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. काँग्रेसचे पाच सदस्यीय प्रतिनिधी मंडळ हिंसाचारग्रस्त भागात दौरा करणार आहे.
सर्वात जास्त हिंसा २४ आणि २५ फेब्रुवारीला झाली. ईशान्य दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आली असून हिंसाचार थांबला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. काँग्रेसचे पाच सदस्यीय प्रतिनिधी मंडळ हिंसाचारग्रस्त भागात दौरा करणार आहे. मुकुल वासनिक, तारिख अन्वर, सुश्मिता देव, शक्तीसिंह गोहील आणि कुमारी शैजला यांचा प्रतिनिधी मंडळामध्ये समावेश आहे. तेथील परिस्थितीचा आढावा काँग्रेसचे पथक घेणार आहे.
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थिती नियंत्रणात आली असून नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी दुकाने सुरू केली आहेत. परिस्थिती पुर्वपदावर येत असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दरम्यान दिल्ली हिंसाचाराचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्यात आला आहे. सीएए समर्थक आणि सीएएला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी हिंसाचार पसरला होता.