महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रामपूर बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा - RAPE ACCUED NAZIL

रामपूर बलात्कार प्रकरणी आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

रामपूर बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा
रामपूर बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

By

Published : Dec 18, 2019, 8:58 PM IST

रामपूर - शहरातील कोतवाली भागामध्ये 6 वर्षाच्या निरागस मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. नाझील असे आरोपीचे नाव आहे.

रामपूरमध्ये 7 मे रोजी पीडित मुलगी गायब झाली होती. शोधाशोध करूनही मुलगी न सापडल्याने कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 22 जून रोज एका वापरात नसलेल्या घरामध्ये मुलीचा सागांडा सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी नाझील नावाच्या व्यक्तीला अटक केली होती.

हेही वाचा -'रेल्वे ट्रॅक ओलांडू नका'; चक्क यमराज देतोय प्रवाशांना समज

न्यायाधीश विनोद कुमार यांनी आरोपीला 13 डिसेंबरला दोषी ठरवले होते. या प्रकरणाची सुनावणी जलद न्यायालयात करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या सातव्या स्मृतिदिनाच्या दिवशी एका मुलीला न्याय मिळाला आहे.

हेही वाचा -उर्दू लेखक मुजतबा हुसैन पद्मश्री पुरस्कार करणार परत

ABOUT THE AUTHOR

...view details