पटना (मोतिहारी) -बिहारच्या आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका तीन वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाचा मृत्यू झाला. मोतिहारीजवळील आजादनगर येथे हा प्रकार घडला. प्रिन्स मुन्ना कुमार असे मृत मुलाचे नाव आहे.
वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मोतिहारीत तीन वर्षीय बालकाचा मृत्यू - Mahavir Cancer Hospital
वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका तीन वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाचा मृत्यू झाला. मोतिहारीजवळील आझादनगर येथे हा प्रकार घडला. प्रिन्स मुन्ना कुमार असे मृत मुलाचे नाव आहे.
ही घटना मोतिहारीच्या कल्याणपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागात घडली. आजादनगर येथे राहणाऱ्या मुन्ना कुमार यांच्या तीन वर्षीय मुलाला ब्लड कॅन्सर होता. पटनातील महावीर कॅन्सर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला कल्याणपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तिथून त्याला पाटण्याला नेण्यास सांगण्यात आले.
प्रिन्सला पाटण्याला नेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने रुग्णवाहिका देण्यास असमर्थता दर्शवली. खासगी रुग्णवाहिकेने पाच हजार रुपयांची मागणी केली. प्रिन्सच्या कुटुंबीयांकडे पाच हजार रुपये नसल्याने ते वेळेत त्याला रुग्णालयात दाखल करू शकले नाही. या दरम्यान प्रिन्सचा मृत्यू झाला.