नवी दिल्ली - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी साजरी केली जात आहे. नेहरू यांचे आवास आनंद भवन या ठिकाणी ही पुण्यतिथी साजरी होत आहे.
सोनिया, राहुल यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पुण्यतिथीनिमित्त वाहिली नेहरूंना श्रद्धांजली
सर्व धर्माचे धर्मगुरू आपआपल्या धर्मग्रथांचे याठिकाणी पठन करणार आहेत. सोबतच प्रार्थना सभा आयोजित करत नेहरूंना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
सर्व धर्माचे धर्मगुरू आपआपल्या धर्मग्रथांचे याठिकाणी पठन करणार आहेत. सोबतच प्रार्थना सभा आयोजित करत नेहरूंना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए प्रमुख सोनिया गांधी यांच्यासह पक्षाचे अन्य दिग्गज नेत्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना श्रद्धांजली वाहिली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात उडी घेतली.