महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लज्जास्पद! भोपाळमध्ये पोलिसांवर जीवघेणा हल्ला; दोघे गंभीर जखमी - भोपाळ लॉकडाऊन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. मात्र, काही ठिकाणी पोलिसांवरच हल्ले होत आहेत. भोपाळमधील तलैया पोलीस ठाण्याच्या परिसरातही असाच प्रकार झाला.

Bhopal Police
भोपाळ पोलीस

By

Published : Apr 7, 2020, 12:22 PM IST

भोपाळ - शहरातील तलैया पोलीस ठाण्यात नागरिकांच्या एका गटाने पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. काही लोकांनी एकाच ठिकाणी जमत गर्दी केली होती. या जमावाला हटवण्यासाठी पोलीस गेले असता जमावाने चाकूने पोलिसांवर हल्ला केला. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

भोपाळमध्ये पोलिसांवर जीवघेणा हल्ला

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. मात्र, काही ठिकाणी पोलिसांवरच हल्ले होत आहेत. तलैया पोलीस ठाण्याच्या परिसरातही असाच प्रकार झाला. गर्दीला हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहिद कबूतर काजी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर तलैया पोलीस ठाणे आणि निशातपुरा ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details