रांची(झारखंड) - जीवंत व्यक्तीलाच मृत घोषित केल्याची घटना उघडकीस आली आहे. रांचीच्या चान्हो ब्लॉकमध्ये एका मृत व्यक्तीच्या शवविच्छेदनाची तयारी सुरू होती. मात्र, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना तो श्वास घेत असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेचच त्याला रुग्णालयात आपात्कालीन विभागात दाखल केले.
रांचीत मृत व्यक्ती शवविच्छेदन करताना झाला जीवंत - रांची न्यूज
रांचीत एका व्यक्तीच्या शवविच्छेदनाची तयारी सुरू असताना तो जीवंत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

रांचीत मृत व्यक्ती शवविच्छेदन करताना झाला जिवंत
रुग्णालयात पुन्हा दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा त्याला मृत घोषित केले. मृत हा खरता गावातील रहिवासी होता. तो उच्च दबावाच्या विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.