नवी दिल्ली - कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी येत्या 14 एप्रिलपर्यंत म्हणजेच 21 दिवस नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. जनता घरातच थांबावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. एके काळी देशभरात प्रसिद्ध असणारी 'महाभारत' ही मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
कोरोनामुळे आता भारतात 'महाभारत'ही होणार सुरू - महाभारत' ही मालिका पुन्हा प्रक्षेपित
एके काळी देशभरात प्रसिद्ध असणारी 'महाभारत' ही मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
बीआर चोप्रा यांच्या अतिशय गाजलेले महाभारत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर निर्णय घेण्यात आला असून महाभारत सीरियल ही दूरदर्शनच्या डीडी भारती वाहिनीवर 28 मार्च म्हणजे आजपासून दुपारी 12 वाजता तर सांयकाळी 7 वाजता प्रसारित केली जाणार आहे. जेणेकरून लॉकडाऊन कालावधीत लोकांचे मनोरंजन होईल.
कोरोनामुळे देशाला खरोखरच लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना पुढील २१ दिवस आपल्या घरातच बसून काढायचे आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनेही लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. यानुसार डीडी नॅशनल, म्हणजेच दूरदर्शनवर ही मालिका दाखवण्यात येणार आहे. दूरदर्शनवर लागणाऱ्या या मालिका पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहे.