नवी दिल्ली -हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणानंतर देशातील बलात्कार प्रकरणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बलात्कार प्रकरणातील आरोपींना सहा महिन्यांत फासावर लटकावले पाहिजे, या मागणीसाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल मंगळवारपासून अमरण उपोषण करणार आहेत.
हैदराबाद बलात्कार पीडितेची आर्त हाक मला 2 मिनिटेही शांत बसू देत नाही. बलात्कार प्रकरणातील आरोपींना सहा महिन्यांत फासावर लटकावले पाहिजे. जोपर्यंत हा कायदा लागू होत नाही. तोपर्यंत मी जंतर-मंतर येथे अमरण उपोषणाला बसणार आहे, असे स्वाती मालीवाल यांनी टि्वट करून म्हटले आहे.