हैदराबाद- मुथ्थुटू फायनान्सच्या वतीने शमशाबादचे पोलीस उपायुक्त एन प्रकाश रेड्डी यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. जानेवारी महिन्यात तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसूर येथील मुथ्थुटू फायनान्सच्या शाखेवर दरोडा पडला होता. भर दिवसा टाकलेल्या या दरोड्यात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून २५ किलो सोने लंपास केले होते. त्यातील ७ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात समाशाबाद पोलिसांनी महत्वाची कामगिरी बजावली होती.
मुथ्थुटू दरोड्यातील आरोपी जेरबंद; फायनान्सने मानले समशाबाद पोलिसांचे आभार - niwas nikam
जानेवारी महिन्यात तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसूर येथील मुथ्थुटू फायनान्सच्या शाखेवर दरोडा पडला होता. भर दिवसा टाकलेल्या या दरोड्यात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून २५ किलो सोने लंपास केले होते.
शमशाबादचे पोलीस उपायुक्त रेड्डी यांच्यासह रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत, सायबराबादचे पोलीस आयुक्त सज्जनार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी वेळीच सुत्रे हलवून सात आरोपींना जेरबंद केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुथ्थुटू फायनान्स यांच्याकडून उपायुक्त रेड्डी यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी मुथ्थुटू फायनान्सचे सीईओ विनोद कृष्ण कुमार, संचालक थॉमस जॉन, मराठा मंडळाचे उपाध्यक्ष निवास निकम, मदन पाटील यांची उपस्थिती होती.
तामिळनाडूच्या होसुर शहरातील बागालूर रोडवरील मुथ्थुटू फायनान्सच्या शाखेतून दरोडेखोरांनी 25 किलो सोने आणि 96 हजार रुपये रोख रक्कम लुटली होती. दरोडेखोरांची ही आंतराज्यीय सक्रीय टोळी नागपूरमार्गे छत्तीसगडमधून मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होती. तत्पूर्वी सायबराबाद, शमशाबाद पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत सात दरोडेखोरांना ताब्यात घेतले.