महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कलम ३७०: काश्मीरातील १०५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्बंध शिथिल - india pak

काश्मीरातील सर्वच्यासर्व १०५ पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रामध्ये दिवसाच्या वेळी लागू असलेले निर्बंध शिथिल आले आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 28, 2019, 3:26 PM IST

श्रीनगर- काश्मीरची स्वायत्ता काढून घेतल्यापासून राज्यातील अनेक भागांमध्ये निर्बंध लागू आहेत. काश्मीरातील सर्वच्यासर्व १०५ पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रामध्ये दिवसाच्या वेळी लागू असलेले निर्बंध शिथिल आले आहे. परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले.

५ ऑगस्ट रोजी काश्मीर राज्यासाठी असलेला विशेष दर्जा केंद्र सरकारने काढून घेतला. ३७० अनुच्छेद रद्द केल्यानंतर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आले आहे. त्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून राज्यामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच अनेक भागांमध्ये सचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्ताव अनेक भागांमध्ये संपर्क व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे.

राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचा दावा काश्मीर प्रशासनाने केला आहे. अनेक भागांमध्ये शाळा महाविद्यालये सुरळीत चालू असून संवेदनशिल भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. औषधे आणि वैद्यकीय साहित्याचा काश्मीरमध्ये मुबलक प्रमाणात पुरवठा केला असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मात्र, पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहे. त्यामुळे सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details